Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुलढाणा ग्रामपंचायत: ग्रामसेवक महिला सरपंचाचा गप्पांचा व्हिडीओ व्हायरल

बुलढाणा ग्रामपंचायत: ग्रामसेवक महिला सरपंचाचा गप्पांचा व्हिडीओ व्हायरल
, बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (12:12 IST)
जनता ही बदमाश आणि मतदान करणारी चोर आहे असं बुलढाण्यातील एक ग्रामसेवक महिला सरपंचाला सांगत आहे, आणि यापुढेही जाऊन भ्रष्टाचार  कसा करायचा याचा पाठही देताना दिसत आहे. या संबंधित बुलढाण्यातील डोनगाव या ग्रामपंचायतीतील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भ्रष्टाचाराची मूळं समाजात किती खोलपर्यंत आणि किती खालच्या पातळीवर रुजलेली आहेत हे या व्हिडीओ मधून दिसत आहे. 
 
बुलढाणा मध्ये मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीची ग्राम पंचायत मध्ये ग्रामसेवक आणि महिला सरपंचामधील भ्रष्टाचाराचे धडे शिकवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडीओ मध्ये ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे डोनगाव ग्रामपंचायतीत नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ पढवत आहे. हे संभाषण सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे. 
 
व्हिडीओमधून मेहकर तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सरपंच व सरपंच पती यांना म्हणतात,पावसाळा लागला की आपण कान डोळे बंद करायचे जसं जळतं तसं जळू द्या कारण जनता बदमाश आहे. तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केले, एकाही चोराने फुकट मतदान केले नाही, मतदान करणारे चोर आहेत.आपण येथे पैसे खाण्यासाठी बसलो आहे ,आपल्याला पैसे खाण्याचा अधिकार आहे.

या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सरपंचाचा पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल आणि प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेले असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

अशे प्रकारचे संभाषण असलेला व्हिडीओ पाहून ग्रामस्थ संतापले असून या प्रकारची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nashik :स्विमिंग पूलमध्ये पोहताना तरुणाला हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू