Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील एफ सी रोड वरील 'बर्गर किंग' नाही तर 'बर्गर काच' एक पोहोचला आयसीयुत

पुण्यातील एफ सी रोड वरील 'बर्गर किंग' नाही तर 'बर्गर काच' एक पोहोचला आयसीयुत
, मंगळवार, 21 मे 2019 (10:00 IST)
बर्गर किंग नाही बर्गर काच असे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, की चीनी लोकांसारखे आपणही मोठ्या नावांचे कॉपी करत दुकाने सुरु करत आहोत का ? आणि त्यातही पुणे येथील घटना असल्याने त्यावर विश्वास होणे अगदी सोप्पे आहे. मात्र घटना वेगळी आहे आणि गंभीर आहे. कारण एका मित्राला दुसऱ्या मित्राला बर्गर किंग येथे पार्टी करणे महागात पडले आहे. तो बर्गर खावून आय सी यु मध्ये पोहोचला आहे.
 
सविस्तर असे की, पुण्यात रिक्षाचालक म्हणून काम करणारा साजित पठाण हा गेल्या काही दिवसांपासून मित्रांना भेटला नव्हता. मित्रांची भेट झाली नाही म्हणून त्यांनी बर्गर किंगच्या एफसी रोडवरील आऊटलेटमध्ये भेटण्याचे ठरविले. त्यानंतर ते तेथे भटले. साजितने त्याच्यासाठी आणि मित्रांसाठी बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स आणली होती. त्यानंतर सर्व मित्र गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता त्यांनी बर्गर खाण्यास सुरुवात केली. तेव्हा साजितला अचानक ठसका लागला. त्यानंतर त्याच्या तोंडावाटे रक्त येऊ लागले. त्यामुळे मित्र घाबरले. त्यांनी त्याला थेट रुग्णालयात नेले. याप्रकऱणी पोलिसांत रीतसर या तरुणांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळून आले. त्यानंतर बर्गरकिंगमधील त्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेत पोलिसांनी मागविले आहे. त्यामुळे बर्गर किंग नव्हे तर बर्गर काच अशी चर्चा सर्वत्र होती, मात्र आता तपास पूर्ण होताच सर्व गोष्टी कळतील. डेक्कन जिमखान पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३३७ अन्वये बर्गर किंग विरोधात गुन्हा नोंदवला आहे.साजित पठाणचा मित्र अजय चाकले याने मिड-डे या वृत्तपत्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.बर्गर किंग या प्रसिद्ध ब्रांडच्या FC रोडवर असलेल्या आऊटलेटमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी विखे यांचे कट्टर विरोधक थोरात यांची वर्णी