Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपघातानंतर 9 तासांनी बसला PUC प्रमाणपत्र देण्यात आले

buldhana bus accident
Nagpur Mumbai Samruddhi Highway Accident नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती मार्गावर लागलेल्या लक्झरी बसला आग लागून 25 प्रवाशांचा मृत्यू झाला, अपघातानंतर नऊ तासांनंतर प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्र जारी करण्यात आले, असे आरटीओ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. याबाबत स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास नोंदणी क्रमांक MH29- BE1819 या लक्झरी बसला खांब आणि दुभाजकाला धडक बसून आग लागली. या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 10.37 वाजता त्याच बसला पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.
 
हे प्रमाणपत्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन डेटाबेसवर देखील पाहिले जाऊ शकते. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले की, चूक आढळल्यास पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल. यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. आरटीओ सूत्रांनी सांगितले की, बसचे पूर्वीचे पीयूसी प्रमाणपत्र 10 मार्च 2023 रोजी संपले होते.
 
यवतमाळ येथील एका PUC केंद्राने नवीन PUC प्रमाणपत्र जारी केले जे दर्शविते की केंद्राने कधीही वाहनाची तपासणी करण्याची तसदी घेतली नाही. यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयाने पीयूसी सेंटर आणि बस मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रत्येक वाहन मालकाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. पीयूसी नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेहुल, नीरव आणि माल्याला पदे मिळणार ! शिवसेनेने मारला टोमणा