Publish Date: Thu, 22 Dec 2016 (17:18 IST)
Updated Date: Thu, 22 Dec 2016 (17:20 IST)
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सातमोरीच्या भरवस फाटा या रस्त्यावर क्रूझर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणासह ६ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशीरा हा अपघात झाल्याचे कळते. राहता तालुक्यातील जळगाव व सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे परिवार अंतापूर ताहराबाद येथे देव दर्शनासाठी क्रूझर गाडीने चालले होते. यावेळी भरवसच्या दिशेने दुचाकीवर विलास यादव पगारे (३८) हे येत होते. या दोन्ही वाहनांची सातमोरी जवळ समोरासमोर टक्कर होऊन या अपघातात विलास पगारे (रा वेळापुर ता कोपरगाव) हे जागेवर ठार झाले. तर क्रूझर गाडी उलटी झाल्याने गाडीमधील लहान मुलगी कल्याणी बाळू घोडेराव (६) हिचा मृत्यू झाला.