ठाणे न्यूज : ठाण्यातील उपवन परिसरातील एका व्यक्तीने वाहतूक पोलिस विभागावर हा आरोप केलाय की वाहने उचलणार्या आणि लुटालुट करणार्या ट्रॅफिक पोलिसांबरोब खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या.
गाड्या उचलून नेणार्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लयसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे ही नव्हती. तसेच योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता व गाड्या उचलण्याचं काम करणार्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हो लोक गाड्या उचलून 500 ते 700 रुपये वसूल करत आहे. असा आरोप लावण्यात आला आहे.
या तक्रारीत हे ही सांगण्यात अले आहे की गाड्या उचलण्याआधी त्यांनी भोंगा लावून सूचना द्यायला पाहिजेत तेही देण्यात येत नसल्याचा आरोप या लावण्यात आला आहे.