सध्या नीट पेपर लीक प्रकरण गाजले आहे. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी लातूर मधून एका व्यक्तीला अटक केली आहे. नाजुधप्पा असे या व्यक्तीचे नाव आहे. हा आरोपी प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात पैसे घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करत होता. त्याने नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्याचा आरोप त्याच्यावर आहे.
सध्या या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु असून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात NEET पेपरलीक , फेर परीक्षा संबंधित इतर गैर प्रकारांवर सुनावणी झाली. खंडपीठाचे नेतृत्व भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि इतर दोन न्यायाधीश जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांनी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आणि दरम्यानच्या काळात न्यायालयासमोर, NTA ने निर्णय घेतला की ग्रेस गुणांसह उमेदवारांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. 23 जून रोजी पुनः परीक्षा झाली आणि ज्या विद्यार्थ्यांना 67 गुण मिळाले होते त्यांना या परीक्षेत 61 गुण मिळाले.