Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये परवानगीशिवाय २६ लोक भुजबळांना भेटले

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये परवानगीशिवाय  २६ लोक  भुजबळांना भेटले
, शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:16 IST)
काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 26 जणांनी कुठलीही परवानगी न घेता भुजबळ यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली  आहे. यामध्ये आमदार, खासदारांचा समावेश आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाकडून ही माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे. यातून भुजबळांकडून गैरवापर करण्यात आल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आता या सगळ्याची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीने सेक्सला दिला नकार, पतीने कापला स्वत:चा लिंग