Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

भुजबळांकडून अंजली दमानियांना अब्रू नुकसानीची नोटीस

chagan bhujbal
, गुरूवार, 18 मे 2017 (23:02 IST)

छगन भुजबळांकडून अंजली दमानियांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची ऑर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.  दमानिया यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं पत्रातून छगन भुजबळ यांनी  म्हटलं होतं.  भुजबळ यांनी करागृहातून पत्र लिहून दमानिया यांचे सगळे आरोप फेटाळले होते.  गेल्या 14 महिन्यांपेक्षा अधिक काळ आम्ही तुरूंगात आहोत. पण आम्हाला जामीन मिळू नये, इस्पितळात ट्रीटमेंट मिळू नये यासाठी ठराविक काळाने आमच्याविरोधात खोट्या खोळसाड बातम्या पसरवल्या जात आहेत जणू आमच्या जीवावरच आमचे विरोधक उठले असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. नियमानुसारच घरचा डबा मिळत असल्याचा खुलासा भुजबळांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुना पदपूल कोसळला ,५० हून अधिक लोक पडल्याची भीती