Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कटकारस्थानामुळे जवळपास अडीच वर्षे आम्हाला मधे रहावे लागले - भुजबळ

कटकारस्थानामुळे जवळपास अडीच वर्षे आम्हाला मधे रहावे लागले - भुजबळ
महाराष्ट्रात हुकुमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या भाजप शिवसेनेला मतदारांनी आपली जागा दाखवून दिली असून महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेनेला जोरदार चपराक दिली असून त्यांची मस्ती जिरवली असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यवनी विक्रमी मताधिक्य मिळवत विजयाचा चौकार मारला. यावेळी येवला येथील संपर्क कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आज कुटुंबियांच्या एका डोळ्यात आश्रू तर एका डोळ्यात आनंद आश्रू आहे.कटकारस्थानामुळे जवळपास अडीच वर्षे आम्हाला मधे रहावे लागल्याने जनतेशी संपर्क तुटला होता. तरी सुद्धा विकासाची अनेक कामे मार्गी लावली त्यावर विश्वास ठेवत येवल्याच्या जनतेने आमच्या पाठीशी राहून भरीव मतदान केले असून येवल्यातून जवळपास ५७ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविता आला आहे. मात्र पंकज भुजबळ यांचा थोड्या मताने पराभव झाला असून जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
 
ते म्हणाले की, भाजप शिवसेना युती सरकारने अब की बार २२० पारचा नारा दिला मतदारांनी भाजपला जोरात तर शिवसेनेला हळुवारपणे चपराक दिली आहे. आजचा हा विजय ५७ हजार मताहून अधिक आहे मागच्या वेळेला आपल्याला ४६ हजाराहून अधिक लीड मिळाले या वेळेस आपल्याला काही नेते सोडून गेले. त्यामुळे यंदा आपले लीड १० हजारानी अधिक वाढले आहे. हा विजय कार्यकर्त्यांचा विजय असून आपण त्यांना समर्पित करत आहोत असे सांगत मतदारांचे आभार मानले.
 
ते म्हणाले की, आजच्या विजयाने छगन भुजबळ हा येवला लासलगावचा भूमिपुत्र आहे. हे जनतेने विरोधकांना स्पष्ट करून दिले असून केवळ जात पात सोयरे नको तर विकास पुत्र पाहिजे हे येवलेकरांनी दाखवून दिले. येवल्यातील तथाकथित नेत्यांना येवलेकरांनी आपली जागा दाखवून दिली असून यापुढे नेते नव्हे तर कार्यकर्ते राजकारण करतील. येवला नंबर एक करण्याचा निर्धार पुढील पाच वर्षात पूर्ण करू, येवल्याचा नागरिकांना जी वचने दिली ती पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे.मांजरपाडा प्रकल्प असेल शिवसृष्टी यासारखे प्रकल्प मार्गी  लावून येथील जनतेचे अश्रू पुसण्याचे काम करणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
ते म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत भाजप सेनेची मस्ती जनतेने जिरवली आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळविला आहे. पवार साहेबांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असून सेना भाजपने बघितलेले स्वप्न अखेर फोल ठरले असून पुढील पाच वर्षाच्या राजकारणात काहीही होऊ शकते असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की , नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पहिला क्रमांक आहे असून राज्यात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले असूनअब की बार दोनशे वीस पारचे स्वप्न पाहणाऱ्या भाजप शिवसेनेची जनतेने तुमची दादागिरी चालणार नाही हे आजच्या निकालावरून स्पष्ट करून दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पक्षांतर करणारे गावित बंधू-भगिनी पराभूत