चक्रीवादळ 22 मार्चपर्यंत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे.येत्या एक-दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्यामुळे उकाडा वाढला आहे. येत्या दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसनी चक्री वादळ कोकण किनारपट्टीवर धडकून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट सांगण्यात आले आहे. हवेचा वेग वाढेल कोकण पट्टीवरील नागरिकांनी काळजी घेण्यास सांगितले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना याचा फटका बसू शकतो. या चक्रीवादळी मुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
रविवारी 20 मार्च रोजी अंदमान निकोबारमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सोमवारी 21 मार्च रोजी 70-80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. हे वारे ताशी 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमध्ये बदलण्याची शक्यता आहे . जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.