इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, इयत्ता पाचवी आणि आठवीतील नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
या बाबतचे नोटिफिकेशन शासनाकडून जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापनाची कार्यपद्धती निश्चित करेल. विद्यार्थी नापास झाल्यावर विद्यार्थी संबंधित विषयासाठी शिक्षकांकडून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन मिळवू शकेल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षा घेतली जाईल. या शिवाय इयत्ता पाचवीच्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरुपात वर्गात प्रवेश मिळेल. इयत्ता सहावी ते सातवीच्या वर्गात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी उत्तीर्ण करणे बंधनकारक असेल. विद्यार्थी नापास असल्यास त्याला पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.