राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दावर राजीनामा द्यावा. तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणे कडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या बाबत शरद पवार यांनी अगोदर एक विधान केले, त्यानंतर घुमजावही केले. मात्र, राज्यातील साडे अकरा कोटी जनता हे सहन करणार नाही. रेणू शर्मांची चौकशी जरूर करा पण करूणाचं काय? ती माहिती इतके दिवस का लपवली. या नैतिकतेच्या मुद्यावरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.