Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीत भारनियमन नाही : ऊर्जामंत्री

दिवाळीत भारनियमन  नाही : ऊर्जामंत्री
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:04 IST)

राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र  मुंबई शहरात कुठलेही भारनियमन होणार नाही. विजेची कमतरता भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून १२०० मेगावॅट वीज घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

मोठ्या शहरांमध्ये भारनियमन केले जाणार नाही. भारनियमन केवळ नगरपालिका भागातच करण्यात येईल. ते ही तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. दिवाळीत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जनतेने काही दिवस विजेची बचत करावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले. येत्या १५ दिवसांत विजेची समस्या सुटेल आणि परिस्थिती सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘संताप मोर्चा’चं आयोजन मनसेवर गुन्हा दाखल