सन 2030 पर्यंत सर्वांना शाश्वत वीज देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. याचा आराखडा आणि नियोजन करण्यात आले असून सौर ऊर्जा विकास आणि वापर वाढविण्यात येत आहे. सौरउर्जेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सुरळीत, सुरक्षित आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नांदेड येथील महावितरणतर्फे आयोजीत वीज ग्राहक तक्रार निवारण बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपस्थित ग्राहकांनी रोहित्र दुरुस्ती, वाकलेले खांब, लोंबकाळणाऱ्या तारा, प्रलंबित शेतीपंप जोडण्या, घरगुती व वाणिज्य वर्गवारीतील प्रलंबित जोडण्या, चुकीची देयके, वीज मिटर वाचक एजन्सी विरुद्ध तक्रारी सह शेतकऱ्यांना नियम बाह्य रोहित्र वाहतुकीसाठी द्यावा लागणारा खर्च, मोबाईल बंद ठेवणे आदीबाबत 93 तक्रारी मांडण्यात आल्या.