Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये बदल जाहीर

MPSC Exam Date
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून स्पर्धा परीक्षेची तयारी निर्णय हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत प्रशाकीय कारणाने मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये बदल जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. 
आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या जुन्या तारखा आणि इतर काही महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अनेक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 
आता राज्यसेवा मुख्य परीक्षा आता सुधारित तारखांनुसार पार पडणार आहे. 5 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणार परीक्षा असून आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर या बद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांनी ते बघून आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
असे आवाहन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांमधील वर्ग-1 आणि वर्ग-2 च्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली