Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्वांसाठी पुन्हा खुला

shingnapur
, शनिवार, 18 जून 2022 (09:14 IST)
शनीशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. १८ जूनपासून भाविकांना या चौथथऱ्यावरून तेल अभिषेक करता येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मधल्या काळात सुरक्षेच्या काणास्तवर चौथरा सर्वांसाठी बंद ठेवण्यात आला होता.
 
गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही मागणी होती यानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्तने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी परवानगी दिली आहे.
 
ज्या भाविकांना शनी देवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची ५०० रुपयांची देणगी पावती घ्यायची आहे. तेल अभिषेक पावतीसाठी भाविकांनी देवस्थानचे तेल विक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.
 
राज्यासह, देशभरातील अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर शनी भक्तांच्या मागणीचा विचार करून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रियकराने लग्नाला नकार; कल्याणला राहणाऱ्या 24 वर्षीय मृत तरुणीची आत्महत्या