Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Chhatrapati Sambhajinagar : आईने आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला विकले

baby legs
, बुधवार, 21 जून 2023 (11:33 IST)
आई आणि मुलाचे नातं वेगळेच असते. आपल्या मुलांसाठी आई काहीही करू शकते. आपल्या धर्मग्रन्थात आईचे स्थान मोठे आहे. आई सारखे दैवत या जगात कोणी नाही. आईही आपल्या मुलांची वैरीण कधीही होऊ शकत नाही. पण छत्रपती संभाजी नगरातुन एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याला म्हणजे आपल्या अडीच महिन्याच्या चिमुकल्याला विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पैठणच्या एका 40 वर्षीय महिलेने आपले बाळ शहरातील एका अनाथालयाला विकले आहे. पाच लाखात महिलेने हे बाळ विकल्याची माहिती समोर आली आहे.  

सदर प्रकार छत्रपती संभाजी नगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशंकर कॉलोनीतील जिजामाता बालक आश्रमातील आहे. या प्रकरणी बाळाची आई, मामा, अनाथालयाचे चालक,आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. हे बाळ महिलेने पाच लाख रुपयात विकले आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नांदेडमध्ये गोरक्षकाची हत्या, काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्ला; अनेक जखमी