ईव्हीएमवरून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ईव्हीएमवर विरोधक प्रश्न उपस्थित करत असताना भाजप सरकारचे मंत्री आणि नेते मात्र त्याच्या बचावात उतरले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी राहुल गांधी आणि राज्यातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला
सीएम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या लोकांनी जिथून जिंकले आहे तिथून राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी.
सीएम एकनाथ शिंदे म्हणाले की, जिथे महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या आहेत, तिथे ईव्हीएम ठीक आहे आणि कुठे हरले आहे, मशीनमध्ये बिघाड आहे, हा कसला प्रकार आहे?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन जागेवरून विजयी झाले आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिगाड आहे का? ईव्हीएम मध्ये बिगाड असल्यास राहुल गांधींनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरी जावे.
तत्पूर्वी, राहुल गांधींनी इलॉन मस्क यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेले ट्विट रिट्विट केले आणि लिहिले की भारतातील ईव्हीएम एक "ब्लॅक बॉक्स" आहेत आणि कोणालाही ते तपासण्याची परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची दाट शक्यता वाढते.
इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे काढून टाकली पाहिजेत, असे लिहिले होते. मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका जरी कमी असला तरी अजूनही खूप जास्त आहे. असे ते म्हणाले.
इलॉन मस्क यांच्या इव्हीएमच्या वक्तव्यावरून देशात जोरदार घमासान सुरु आहे.तर महाराष्ट्रात मोबाईलद्वारे ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला जात आहे.