Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं संपूर्ण लक्ष

eknath shinde
, बुधवार, 13 जुलै 2022 (20:52 IST)
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्याआपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसार माध्यमांना सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे.'
 
'कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील, असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता,मायक्रोप्लास्टिक खाणारे आर्धा इंचिचे मासे