Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

अक्कलकोटच्या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी दखल घेतली

eknath shinde
, रविवार, 24 जुलै 2022 (17:46 IST)
अक्कलकोट जवळ सोलापूर- गाणगापूर एसटी बसचा आज सकाळी अक्कलकोट -मैंदर्गी मार्गावर शेतालगत 70 प्रवाशांना घेऊन निघालेली एसटीची बस पालटून अपघात झाला . या बस मध्ये 14 ते 20 प्रवासी जखमी झाले आहे.अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दोनच डॉक्टर असल्यामुळे रुग्णांच्या उपचारात गैरसोय होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी झालेल्या अपघाताची बातमी कळल्यावर या प्रकरणात दखल घेत अपघातात जखमी झालेल्या रुग्णाच्या योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच इतर प्रवाशांची योग्य काळजी आणि व्यवस्था करावी अशा सूचना देण्यात आल्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपुरात जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंट करणे महागात पडले