Publish Date: Fri, 02 Feb 2024 (13:42 IST)
Updated Date: Fri, 02 Feb 2024 (13:45 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डोळ्याचा त्रास होत असल्याने डोळ्याची तपासणी केल्यावर त्यांच्या डोळ्यावर लेझर ट्रीटमेंटने शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास डोळ्यावर लेझर ट्रीटमेंटद्वारे एक छोटीशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ल्ला दिला होता. शस्त्रक्रिया नंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतले आहे.या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.