Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह मुख्यमंत्री आवास 'वर्षा' सोडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह मुख्यमंत्री आवास 'वर्षा' सोडले
, बुधवार, 22 जून 2022 (23:31 IST)
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान सोडले आहे.आपले सर्व सामान आणि कुटुंबासह ते मातोश्रीवर स्थलांतरित झाले आहेत.आपल्या पक्षाचा एकही आमदार आपल्या विरोधात असेल तर आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, अशी घोषणा स्वतः उद्धव यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हमध्ये केली होती.मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' रिकामे करण्यासही ते तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. 
 
आता उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करून त्यांच्या घरी म्हणजे मातोश्रीवर गेल्याचे वृत्त आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव हे मातोश्रीवरूनच सीएमची कामे करतील.मात्र, त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही.काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यात मुख्यमंत्री उद्धव यांचे सामान वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर नेत असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांची आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस ठाकरे हे त्यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर गेले. ठाकरे वर्षा बंगल्या बाहेर पडतांना अत्यंत भावूक वातावरण झालं असून उद्धव ठाकरे हम तुम्हारे साथ है..अश्या घोषणाचे बॅनर घेऊन हजारो शिवसैनिक रस्त्यात उभे असून ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.
 
तत्पूर्वी बुधवारी एका व्हर्चूवल भाषणात ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करणाऱ्या बंडखोर आमदारांना एकत्र येणाची ऑफर दिली होती.राज्यातील राजकीय पेचप्रसंगाला नवे वळण देत त्यांची जागा शिवसैनिकाने घेतल्यास आनंद होईल, असे ते म्हणाले.
 
ठाकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार अननुभवी असूनही त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अनेक दशकांपासून शिवसेनेचे राजकीय विरोधक असतानाही महाआघाडी अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले.माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार. आज मी वर्षावरील मुक्काम हलवतोय.मुख्यमंत्री पदावर बसायला शिवसैनिक तयार असल्यास मला आनंदच होणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Labour Card 2022: ई- श्रमिक कार्ड ऑनलाइन नोंदणी, पात्रता, उद्दिष्टये, लाभ, अर्ज कसा करावा जाणून घ्या