माजी पोलिस उपायुक्त डॉ संजय अपरांती यांच्या नेतृत्वाखालील “सिटीझन फॉर गुड गव्हर्नन्स”ची 25 सदस्यांची नाशिककरांची टीम तयार करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून ही टीम आता नाशिकसाठी कार्य करणार आहे.
गुन्हेगारांसोबत फिरणाऱ्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी व त्यायोगे नविन निरागस मुले गुन्हेगार बनण्याच्या प्रक्रियेतून वाचवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारीवर्ग प्रयत्नशील राहील अशी संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेप्रमाणे माजी पोलीस अधीक्षक डॉ संजय अपरांती यांना नाशिक च्या गुन्हेगारी जगाची व नागरी जीवनाची खडा-न-खडा माहिती असल्याने त्यांनी तात्काळ आपल्या मित्र मंडळी पैकी चांगले २५ नागरिक एकत्र करून आम्ही आपल्या संकल्पनेला प्रतिसाद द्यायला तयार आहोत असे अभिवचन देण्यासाठी पोलीस आयुक्त साहेबांना आज भेटले. गुन्हेगार, गुन्हेगारी आणि नाशिक ची कायदा सुव्यवस्था कमिशनर साहेब जयंत नाईकनवरे व डॉ संजय अपरांती यांच्यासह सिटिझन्स फॉर गुड गव्हर्नन्स चे25 पदाधिकारी यांची माननीय पोलीस आयुक्त यांच्या दालनात सुमारे दिड तास सविस्तर चर्चा झाली. नाशिकला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी अपरांती अकॅडमी चे संचालक व माजी पोलीस उपायुक्त डॉ संजय अपरांती यांनी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी “सिटिझन्स फॉर गुड गव्हर्नन्स”नाशिक च्या पदाधिकाऱ्यांचे व डॉ संजय अपरांती यांच्या पुढाकाराचे कौतुक करून नाशिक पूर्णतः गुन्हेगारी मुक्त होईल या बाबत विश्वास व्यक्त केला. अशा प्रकारचा पुढाकार घेणारे व नागरी सहकार्य व सहभाग करण्याची हमी देणारे कदाचित महाराष्ट्रात नाशिक हे एकमेव शहर देश पातळीवर असेल हे व्यक्त करून नागरिकांची पाठ नाईकनवरे यांनी थोपटली.
डॉ. संजय अपरांती म्हणाले की जयंत नाईकनवरे यांच्या सारखा एक निर्भीड, निस्पृह आणि कर्तव्य कठोर अधिकारी नाशिक ला लाभला हे नाशिक करांचे खरोखर सुदैव म्हणावे लागेल. नाईकनवरेंचे प्रभावी कर्तृत्व लक्षात घेऊन नाशिककर आपल्या कार्यकाळाचा नाशिकला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पूर्णतः सदुपयोग करून घेऊ, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “सिटीझन फॉर गुड गव्हर्नन्स”या संघटनेत मोठ्या संख्येने सामील व्हा व नाशिक गुन्हेगारी मुक्त करा असे आवाहन डॉ संजय अपरांती यांनी नाशिक करांना दिला आहे.