Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

व्यापाऱ्याची तहसील कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या

city-cotton-merchant-hanging-taking-suicide
, बुधवार, 1 डिसेंबर 2021 (10:22 IST)
भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) असे युवकाचे नाव असून शेवगाव तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या लिबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ३० रोजी उघड झाली. तो बाभुळगाव येथील रहिवासी आहे.
पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविला व मृताच्या नातेवाईकाला खबर दिली.
दरम्यान, पहाटे गळफास घेतला असावा असा पोलिसांच्या अंदाज आहे. शेवगाव एस. टी. आगारात चालकाने फाशी घेतल्याची घटना ताजी असताना महिनाभरात तहसील कार्यालयासमोर व्यापार्‍याने फाशी घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron : मुंबई, पुण्याच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू होणार, 'हे' आहेत नियम