Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली
व्यारा,गुजरात , गुरूवार, 20 एप्रिल 2017 (19:52 IST)
शेतीमालाला उत्पादन खर्च+50% नफा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,विधवा-अपंगांना दरमहा 5000/-मानधन द्या या प्रमुख मागण्यासाठी नागपूर येथून महात्मा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल 2017 रोजी सुरु केलेली शेतकरी आसुड याञा गुजरातमध्ये प्रवेश करताच 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वा.पोलिसांनी अडविली.
 
बळसाणे जि.धुळे येथे सकाळी सभा झाली.नवापूर जि.नंदूरबार येथे महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर शेतकरी आसुड याञा दीड तास अडविली.दरम्यान गुजरात पोलिस मोठा फौजफाटा घेवून रस्त्यावर दाखल झाले.बारडोली येथे गुजरातच्या शेतकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.माञ तिकडे जाण्यास पोलिसांनी मनाई केली.टोलनाक्याशेजारील शेतात सर्व शेतकरी एकञ जमले असतानाच पोलिसांनी धरपकड सुरु केली.जेवण टोलनाक्यावर आलेले असतानाच पोलिसांनी प्रहारचे आ.बच्चू कडू,देवेंद्र गोडबोले,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील,कालिदास आपेट,दिनकर दाभाडे यांना अटक केली.
 
आ.बच्चू कडूंना ताब्यात घेताच प्रहार शेतकरी संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी सहकाऱ्यांसह पोलिस कारवाईला विरोध केला.त्यावेळी पोलिसांनी अपंग महिलांनाही ओढत आणून गाडीत कोबले.कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले.नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर येथे रक्तदानाला गुजरात सरकारने परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.वेगवेगळ्या पोलिस व्हनमधुन महाराष्ट्र,गुजरातमधिल सुमारे 500 महिला,पुरुष,अपंग कार्यकर्त्यांना अटक करुन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे.
कालिदास आपेट 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयसिसच्या तीन संशयितांना अटक