Publish Date: Wed, 24 Feb 2021 (16:12 IST)
Updated Date: Wed, 24 Feb 2021 (16:13 IST)
“पोहरादेवीत जी हजारोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती तसंच नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यासंबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कायदा आणि नियमांचं पालन करण्याबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. मग कोणी आपलंही का असेना….मुख्यमंत्री त्यांना सोडणार नाही, सरकार सोडणार नाही. चूक झाली असेल तर कायदा आपलं काम करेल,” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र यावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी जमवत करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.