Publish Date: Thu, 29 Dec 2016 (10:11 IST)
Updated Date: Thu, 29 Dec 2016 (10:12 IST)
नाशिक मध्ये थंडीचा पारा घसरला असून सर्वाधिक काळ कमी तपमान नोंदवले गेले आहे. वातावरणात दीड अंशाची घट होऊन थंडी 8.4 अंशांवर स्थिरावली. त्यामुळे थंडीने नाशिककरांना दिवसाही गारठले आहेत.मागील आठवडाभरापासून थंडीने वातावरण चांगलेच कमी तपमान नोंद केली आहे . थंडीच्या पार्याने नाशिकमध्ये आठवडाभरापासून घसरण सुरू ठेवली होती. गेल्या सहा दिवसांपूर्वी तापमान 15 अंशावर पोहोचले होते. त्यामुळे वातावरणात गारठा वाढला होता. त्याचबरोबर हवाही वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. त्यामुळे नागरिक दिवस भर उबडार कपडे वापरात असून,ताज्यात निफाड येथे सर्वाधिक कमी तपमान नोंद होते.