Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

Cold wave will intensify in the state for the next 48 hours
, मंगळवार, 9 डिसेंबर 2025 (17:35 IST)
महाराष्ट्रात हिवाळ्याने पुन्हा एकदा तीव्र हजेरी लावली असून, मुंबईसह राज्यात गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
 हवामान खात्यानुसार, विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट येणार असून तापमानात घट होणार. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस घरणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, सातारा या जिल्ह्यात शीतलहर वाढणार आहे. वाढत्या शीतलहरमुळे जनजीवन विस्कळीत  होऊन आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 
ALSO READ: महायुती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवेल-उपमुख्यमंत्री शिंदे
तसेच हवामान विभागाने वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना सावधगिरी बाळगण्याचा विशेष सल्ला दिला आहे. राज्यातील येत्या 48 तासांत या भागांत शीतलहरचा जोर वाढेल. किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी या काळात घराबाहेर अनावश्यक फिरणे रात्रीचा प्रवास, शेतात दीर्घकाळी राहणे टाळण्याचे आवाहन केले आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली