Maharashtra Weather Update राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्याने लवकरच थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुणे आणि शहर परिसरात आज आणि उद्या कोरड्या हवामानासह पहाटे धुक्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले तर अनेक भागात पाऊस पडला. मात्र आता ढगाळ वातावरण कमी झालं आहे. तर राज्यात अनेक भागात गारठा जाणवू लागला आहे. अशात महिन्याच्या अखेरीस राज्यात कडाक्याची थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार असून गहू, हरबरा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, कोकण, कोल्हापूर या ठिकाणी अवकळी पावसाने जोरदार हजेरी लाल्यामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान पुन्हा पुढील 24 तासात राज्याच्या काही भागात पाऊस तर काही भागात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे.