Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महत्वाचे : १० वी चा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलला

महत्वाचे : १० वी चा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलला
, शनिवार, 21 मार्च 2020 (16:54 IST)
दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. नवी तारीख ३१ मार्च किंवा त्यानंतर जाहीर होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
 
दहावीचा एकच पेपर उरला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता. मात्र करोना व्हायरसची रुग्ण संख्या वाढल्याने आणि खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. इतके दिवस दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३ वर