Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार..

Complaint of abduction of Asaram Bapu Ashram worker in Nasik
, शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (16:04 IST)
नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात काम करणारी एका व्यक्ती पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आली असता चार अनोळखी लोकांनी त्यांचे बळजबरीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असता. मात्र पंचवटी पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले.
 
पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 281 /2021 कलम 365, 34 भा.दं.वि या गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती संजीव वैद्य, (वय 44, राहणार आसाराम बापू आश्रम गंगापूर रोड,नाशिक) हे दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजता पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आले असता, चार अनोळखी लोकांनी त्यांचे ब’ळज’ब’रीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
 
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशाने आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 अमोल तांबे व सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि रोहित केदार यांना आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले.
 
त्यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच पथकासह भेट देऊन सदर गुन्ह्यातील येणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर सीसीटीव्ही मध्ये चार इसम इनोवा क्रिस्टा गाडीतून घेऊन जात असल्याचे  दिसून आले. या गाडीचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवून सदर इनोवा क्रिस्टा गाडीचा शोध घेण्याकरता घोटी टोल नाका तसेच शिंदे पळसे टोल नाका या ठिकाणी जाऊन सदर ईनोवा गाडीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याचप्रमाणे CDR  Analysis सुद्धा करण्यात आले.
 
तपासादरम्यान सदर कि’ड’नॅ’प व्यक्ती, गुजरात राज्य अहमदाबाद येथील हाफ म’र्ड’र केस मध्ये बारा वर्षापासून फरार होती. त्याला अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस हे नाशिकला आले व सदर इसमास अहमदाबादला घेऊन गेले अशी माहिती मिळाली.. या घटनेबाबत खात्री करण्याकरता गुजरात अहमदाबाद क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता, त्यांनी तो त्यांच्याकडील साबरमती पोस्टे गुरनं 426/2009 भादवी 307,120(ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यात 12 वर्षे पासून फरार असल्याचे सांगितले. संजीव वैद्य यालात्यांच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे.
 
तरी पंचवटी पोलिस ठाण्याचे पोनि अशोक साखरे ,सपोनि सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी रोहित केदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर अतिसंवेदनशील गुन्ह्याचा गुन्हा घडल्यापासून तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकिस आणला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओव्हरटेक दुचाकीचा अपघात ; अडीच वर्षीय बालक जागीच ठार तर दोघे जखमी