Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यवतमाळ येथे रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करा- पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ येथे रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करा- पालकमंत्री मदन येरावार
भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. 
 
नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी दोन वर्षात जवळपास 13 कोटी रुपये देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करा. विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतच्या प्रस्तावांचे अधिकार आता उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या अशा पुनर्वसित गावांमध्ये टँकरची गरज पडू देऊ नका. मग्रारोहयोअंतर्गत जलसंधारणाची कामे हाती घ्या तसेच जलयुक्तची कामे जुनअखेरपर्यंत संपविण्याचे नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. 
 
यावेळी त्यांनी पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठा, चारा टंचाई, दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजना, दुष्काळनिधी वाटप, बोंडअळी निधी वाटप, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, नरेगाअंतर्गत सुरू असलेली कामे आदींचा आढावा घेतला. 
 
नगर पालिका हद्दति रेन वॉटर हार्वेस्टिंग : नगर पालिका हद्दित पावसाचे बहुतांश पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविन्यपूर्ण योजनेतून आता रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या योजनेकरीता निधी उपलब्ध करून देऊ. शासकीय तसेच खाजगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांनी याबाबत प्रस्ताव तयार करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. यवतमाळ नगर पालिकेअंतर्गत सद्यस्थितीत वॉर्डावॉर्डात जावून नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिका-यांनी दिली. या प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने आणि जलदगतीने करावी, असे निर्देश पालिका प्रशासन अधिका-यांना देण्यात आले. 
 
बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी, नगर पालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे होऊ शकतात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नावाची जोरदार चर्चा