Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साई संस्थानाचा नवीन आणि महत्वपूर्ण निर्णय

compulsory registration
शिर्डीतील साई मंदिरातील गुरुस्थान येथे दानपेटीजवळ नुकतंच एक सहा महिन्यांची मुलगी सापडली होती. यावेळी साई संस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुलीची आईच तिला बेवारस सोडून गेल्याचं उघड झाले आहे. या घटनेकडे पाहाता यापुढे एका वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेशावेळी पालकांना रजिस्टरमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. यात नोंदणीवेळी पालकांना त्यांच्या ओळखीसाठी गेटवरील रजिस्टरमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकाची नोंद करणे अनिवार्य आहे. सदरचा निर्णय आज 1 जूनपासून या निर्णय लागू करण्यात आला आहे.
 
शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी 31 मे सकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान एक महिला आली होती. तिच्या हातात एक लहान मुलगी होती. या महिलेने मुलीसह साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 मधून प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर ही महिला मुलीसह गुरुस्थान मंदिराच्या दानपेटीजवळ पोहोचली. गर्दीचा फायदा घेत त्या महिलेने मुलीला तिथेच सोडले आणि ती  गेट क्रमांक 3 वरुन बाहेर पडली. दरम्यान या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर काही भाविकांनी या चिमुकल्या मुलीला साई संस्थानाकडे दिलं. त्यानंतर संस्थानाने या चिमुकलीची रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन तिची रवानगी नगरच्या चाईल्ड लाईन संस्थेत करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'म्हणून' पालकांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट