Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ,यंदा परीक्षा केंद्राचा घोळ निर्माण झाला

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा गोंधळ,यंदा परीक्षा केंद्राचा घोळ निर्माण झाला
, शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (14:56 IST)
आरोग्य विभागाच्या परीक्षा गेल्या महिन्यात होणार होत्या,परंतु प्रवेश पत्रावर काही चुका असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता.त्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा घोळ झाला आहे.त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्य भरतीच्या परीक्षेचा पेपर दोन सत्रात असून उमेदवारांना एका पेपर साठी सकाळी वेगळे परीक्षा केंद्र एका जिल्ह्यात तर संध्याकाळच्या पेपरचे केंद्र दुसरे वेगळ्या जिल्ह्यात देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षा कशी द्यावी हा मोठा प्रश्न पडला आहे.विध्यार्थ्यांना आपल्या आवडीचे केंद्र निवडण्याचा अधिकार असताना या परीक्षेला आयोजित करणाऱ्या कंपनी कडून विध्यार्थ्यांना वेगळेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. एकाच विद्यार्थ्याला एकाच पदासाठी परीक्षा देण्यासाठी 2 जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे.वेळ देखील एकच दिली आहे.एका पदासाठीची परीक्षे साठी आवेदन केले असताना 430 रुपये फी आकारण्यात आली असताना दोन पदासाठी खात्यातून 860 रुपये काढण्यात आले.काहींनी तर पदासाठी आवेदनच केले नाही तरीही त्यांना प्रवेश पत्र देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षे संदर्भात चांगला गोंधळ उडाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा आयोजित करणारी कंपनी सक्षम नसून देखील त्याच कंपनीकडून परीक्षा घेण्याचा आग्रह का धरला जात आहे. कंपनीच्या सावळ्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.एक पेपर एका केंद्रात तर दुसरा पेपर दुसऱ्या जिल्ह्याच्या केंद्रावर उमेदवारांनी परीक्षा  देण्यासाठी कसे जावे असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा पुढे निर्माण झाला आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाब मलिक यांचे NCB वर गौप्य स्फोट,फ्लेचर पटेल कोण आहे? याचा खुलासा द्यावा