महाराष्ट्र काँग्रेस कडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांचं नाव असल्याची माहिती आहे. चंद्रकांत यांचा गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यंदा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेऊन पुन्हा त्यांना राज्यसभेची उमेद्वारी दिली आहे.
चंद्रकांत हंडोरे हे येत्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून असणार.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता त्या राज्यसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. सोनिया गांधी राज्यसभेतून निवडणूक लढणार असून काँग्रेस ने राज्यसभेची यादी जाहीर केली आहे.
या वेळी बिहार मधून अखिलेश प्रताप सिंग हिमाचल मधून अभिषेक मनू सिंघवी हे राज्यसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे. तर महाराष्ट्रातून काँग्रेस विधानसभेची एकच जागा लढवणार आहे.
विधानपरिषेदच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.या कारणास्तव काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. महाविकास आघाडी एका पेक्षा अधिक उमेदवारांची नावे देणार असे बोलले जात असताना आता काँग्रेस असून फक्त चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता महाराष्ट्रातून भाजपचे किती उमेदवार येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.