Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे पोर्श घोटाळा: काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी, नाना पटोले म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

Nana Patole
, बुधवार, 29 मे 2024 (09:27 IST)
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोळे यांनी सीबीआयचौकशीची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 
एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले.या हत्याकांडात महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मुलाचाही सहभाग असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.  हे प्रकरण लपवण्यासाठी त्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. 

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.ते म्हणाले श्रीमंत आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाब दिसत आहे. फडणवीसांनी आरोपींना वाचवण्यासाठी वकिलीची पदवी वापरली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे. आणि फडणवीसांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. 

ससून जनरल हॉस्पिटल हे गुन्हेगारांसाठी पंचतारांकित हॉटेल असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. काँग्रेस नेते म्हणाले, "राज्य गंभीर दुष्काळाशी झुंज देत असताना, दारू पिऊन गाडी चालवण्याची आणि अंमली पदार्थ सेवनाची प्रकरणे वाढत आहेत." 

फडणवीस यांच्या गावी नागपुरात दोन तरुणींनी दोन तरुणांना त्यांच्या कारने चिरडून ठार केल्याचा दावाही पटोले यांनी केला. त्यांना अवघ्या 10 तासांत जमीन मिळाला तसेच जळगाव मध्ये देखील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 पुण्यात अवैध ड्रग्ज रॅकेट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे आणि नागपुरात बेकायदा पब सुरू आहेत. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यात 36 बेकायदा पब पाडावे .
लागले असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणून महाराष्ट्रातील तरुणांना भाजपने बरबाद केल्याचा आरोप देखील नाना पाटोळे यांनी केला आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नांदेड : पेनगंगा नदीच्या काठी कुटुंबासमोर तीन मुली बुडाल्या