अकोल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा गावात झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात उपचारादरम्यान निधन झाले.
अकोट तालुक्यातील मोहाळा गावात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मशिदीतून नमाज अदा करून आल्यावर त्यांच्यावर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि पोटावर वार केले. त्यांना गंभीर अवस्थेत अकोटच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले. उपचाराधीन असता आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
या हल्ल्यामागे राजकीय व कौटुंबिक वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यांनंतर आरोपी फरार झाला असून पणज गावातील नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.