काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. प्रकृतीत आता सुधारणा झाली असून तब्बल १९ दिवसांनंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २२ एप्रिलला कोरोनाची चाचणी केली असता कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांनतर २३ एप्रिलला पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती खालावल्याने २५ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत.