Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्र्यंबकेश्वर आंबोली रस्त्यावर गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला; 87 लाखांचा अवैध गुटखा जप्त

gutka
, शनिवार, 24 जून 2023 (08:24 IST)
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार गुटखाविरोधी अभियान जिल्ह्यात सुरू आहे. याच अभियाना अंतर्गत आंबोली रस्त्यावर गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडला आहे. यात सुमारे सत्त्याऐंशी लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
 
नाशिक ग्रामीण पोलिसांनी सहा जून पासून जिल्हाभरात गुटखा विरोधी अभियान सुरु केले आहे. सदरच्या कारवाई दरम्यान पान टपऱ्या, गोडावून,दुकाने व इतर अस्थापणांची कसून तपासणी सुरु आहे.
 
याच दरम्यान गुरुवारी २२ रोजी गुटख्याच्या आणखी एक कंटेनर ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. त्यातून सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
 
गुटख्याने भरलेला कंटेनर दिल्ली येथून मुंबई-आग्रा रोडने त्र्यंबकेश्वर,जव्हार, मोखाडामार्गे भिवंडी येथे जात होता. प्रवासादरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आंबोली टी पॉईंट येथे ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कंटेनर पकडला आहे.
 
त्यात रुपये ८७,३८,१००/- लाखांचा एस एच के नावाचा गुटखा मिळून आला आहे. कलम ३२८,१८८,२७२,२७३भादवि नुसार पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर सह नाशिक जिल्ह्यात स्वागत करण्यात येत आहे.


Edited By- Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुरुंगातील कैद्यांना कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यासाठी आता ‘ही’ नवीन सुविधा