Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अतुल भातखळकर यांचे वादग्रस्त ट्वीट

Atul Bhatkhalkar
, सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (21:58 IST)
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तथा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुलायमसिंह यांचा रुग्णालयात उपचार घेत असतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांनी “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो,” असे विधान ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.


मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भातखळकर यांनी त्यांच्या आत्म्याला उत्तमगती लाभो असे विधान केल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनापश्चात तिच्यावर टीका करणे योग्य नाही, अशा आशयाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
 
Edited By - Ratandeep Ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pro Kabaddi League 2022: दबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स सामना, जिंकण्यासाठी लढत सुरु