Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर : 24 तासांत दोघींचा कूलरचा शॉक लागून मृत्यू

नागपूर : 24 तासांत दोघींचा कूलरचा शॉक लागून मृत्यू
, सोमवार, 29 मे 2017 (11:10 IST)

नागपुरात 24 तासांतच दोघींना कूलरचा शॉक लागून जीव गमवावा लागला. छाया राजेश नारनवरे या महिलेचा रविवारी कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाला. नागपूरच्या अनंतनगर भागात ही घटना घडली. तर स्वागतनगर भागात शनिवारी कुलरचा शॉक लागून पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. 5 वर्षीय खुशी कोसे फ्रीजमधून पाण्याची बाटली काढत होती. पण अनावधनाने तिचा खांदा शेजारी असलेल्या कुलरला लागला आणि शॉक लागून तिचा मृत्यू झाला.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बॉम्बफेक, दगडफेकीमध्ये जवानांना मरण्यास सांगू शकत नाही