Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्ही कुलर वापरत आहात मग काही अपघात होऊ नये म्हणून ही काळजी घ्या

तुम्ही कुलर वापरत आहात मग काही अपघात होऊ नये म्हणून ही काळजी घ्या
, गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:16 IST)
सध्या उन्हाळा सुरु आहे. रोज तपमान वाढत असून त्यामुळे अनेक नागरिक थंडावा वाटावा म्हणून विविध प्रकारचे कुलर वापरतात. मात्र काही वेळा चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली तर मोठा अपघात होतो आणि अनेकदा प्राणास मुकावे लागते, यामुळे महावितरण ने कुलर वापरत असाल तर काही खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. अनेकदा या  कुलरचा वापर करताना त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असल्याने कुलरचा गारवा अनुभवताना सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे आणि दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.कुलर लावताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता बाळगायला हवी, त्यासाठी काही गरजेच्या प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करायचा आहे. अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी, कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित आहे, मात्र अनेक लोक हे वीजप्रवाह सुरू असताना कुलरमध्ये पाणी भरतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. कुलरमधील वीजतारांचे (वायरचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री केली पाहिजे, कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही याचीदेखील खबरदारी घेतली पाहिजे.  वीज ग्राहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विखे, मोहिते-पाटलांचा मोदींवर भरोसा नाही नवाब मलिक