Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना नियम मोडणाऱ्यांकडून दीड कोटींचा दंड वसूल

कोरोना नियम मोडणाऱ्यांकडून दीड कोटींचा दंड वसूल
, मंगळवार, 8 जून 2021 (11:32 IST)
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून नियमावली करण्यात आली आहे. यामध्ये मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, व्यावसायाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी टाळणे, निर्जंतुकीकरण करणे, आदींसह विविध सुरक्षेचे नियम जारी केले आहेत. शासनाच्या निर्बंधांचे पालन होते की नाही याची शहानिशा करण्याचे आणि पालन होत नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे काम शहरात महापालिका व पोलिस प्रशासनाकडून करण्यात येते.
 
शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 35 हजार 644 कारवायांमध्ये महापालिका व पोलिस प्रशासनाने 1 कोटी 43 लाख 99 हजार 968 रुपये दंड वसुल केला आहे. यामध्ये 1१ मे ते 2 जून 2021 दरम्यान ६ हजार 348 कारवायांमध्ये 38 लाख 48 हजार 130 दंड वसुल करण्यात आला आहे.
 
त्यानुसार पोलिस प्रशासनाकडून प्रामुख्याने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तर महापालिका प्रशासनाकडून मास्कसह इतर नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने 30 एप्रिलपर्यंत विविध प्रकारच्या 29 हजार 296 कारवाया करून 1 कोटी 5 लाख 51 हजार 838 रुपये दंड वसुल केला आहे. त्यानंतर 1 मे ते 2 जून 2021 दरम्यान 6 हजार 348 कारवायांमध्ये 38 लाख 48 हजार 130 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. प्रशासनाने 2 जून पर्यंत शहरात 35 हजार 644 कारवाया करुन तब्बल 1 कोटी 43 लाख 99 हजार 968 रुपये दंड वसुल केल्याचे माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंत्यविधीस ५०, विवाहास १०० जणांच्या उपस्थितीचे बंधन