Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

लातूरमध्ये एका वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Corona
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (07:38 IST)
लातूर शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या अशा दोन नवीन स्ट्रेनची पुष्टी