Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 February 2025
webdunia

बाप्परे, अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला कोरोना

बाप्परे, अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला कोरोना
, सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (15:58 IST)
एकीकडे अधिवेशन सुरु झाले असतांना राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. याशिवाय तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. 
 
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच राज्यमंत्री तनपूरे यांनी कोरोना रिपोर्टबद्दलची माहिती ट्विट केली. “कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असं राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, “सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला, तरी शेवटी केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या,” अशी माहिती त्यांनी दिली.
 
शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या करोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ते तात्काळ माघारी फिरले. कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पुढील १० दिवस ते घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता शरद पवार यांनाही आला धमकीचा फोन