Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांना डिपॉझिटचे पैसे घेण्यासाठी कपडे काढा आंदोलन

कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांना डिपॉझिटचे पैसे घेण्यासाठी कपडे काढा आंदोलन
, बुधवार, 26 मे 2021 (11:21 IST)
नाशिकमध्ये रुग्णांच्या उपचारानंतर डिपॉझिटपोटी भरलेली दिड लाखाची रक्कम परत न देणार्‍या वोक्हार्ट रूग्णालयाच्या विरोधात ऑपरेशन हॉस्टिपल मोहिमेंतर्गत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रूग्णालयाच्या कार्यालयासमोर कपडे काढत कपडे विका आणि पैसे वसूल करा असा पवित्रा घेत आंदोलन छेडले. 
 
आंदोलनानंतर रूग्णालय प्रशासनाने रूग्णाच्या नातेवाईकांना डिपॉझिटचे पैसे परत देण्याची तयारी दर्शवल्यानंतर मोहिम फत्ते झाली. सिन्नर येथील रहिवासी अमोल जाधव यांनी आपल्या आई, वडीलांना कोरोना उपचारासाठी नाशिकच्या वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले. चौदा दिवसांच्या उपचारापोटी त्यांनी सुमारे दहा लाख रूपयांचे बिल अदा केले. रूग्णांना दाखल करतांना त्यांनी दिड लाख रूपये डिपॉझिटही भरले. रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर 
जाधव यांनी आपली डिपॉझिटची रक्कम परत मिळवण्यासाठी हॉस्पिटलकडे पाठपुरावा सुरू केला. जाधव हे एका कंपनीत सात हजार रूपये पगारावर काम करतात. 
 
डिपॉझिट भरण्यासाठी व्याजाने पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वारंवार हेलपाटे मारूनही रूग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. भावे यांनी ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेंतर्गत रूग्णालयात आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी अंगावरचे कपडे काढत जोपर्यंत डिपॉझिटची रक्कम परत दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर अर्धातासानंतर रूग्णालय प्रशासनाने डिपॉझिटची रक्कम परत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर भावे यांना मुंबईनाका पोलीसांनी ताब्यात घेतले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करणार