Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक येथे पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

नाशिक येथे पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
, मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (21:45 IST)
ओमायक्रोनने नाशिककरांच्या चिंतेत भर पाडली असून पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपुर्वी नाशिकमधील एका खाजगी कंपनीत ही व्यक्ती आली होती. यावेळी त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तर यातील दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकाने चिंता वाढवली आहे.
दरम्यान पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा जेनेटिक सिक्वेन्स पुण्याच्या NIV लॅब कडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर
संपर्कात आलेल्या नागरिकांचे कोरोना अहवाल घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
एकीकडे प्रशासनाची ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असताना परदेशातल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संपर्कात आलेल्यांची तातडीने चाचणी करून घ्यावी असे आवाहन नाशिक प्रशासनाने केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डब्ल्यूएचओचा इशारा - रुग्णालयांनी सज्ज व्हावे, ओमिक्रॉनमुळे मृत्यूची प्रकरणे वाढू शकतात