Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

नेत्याच्या मुलाच्या लग्नात कोरोनाचे नियम धाब्यावर, 2 हजारांची गर्दी

Corona's rule
, सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:23 IST)
कोरोनाच्या नियमांना हरताळ फासत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात सर्व नियम मोडत सुमारे २ हजारांची गर्दी जमा झाली होती.  
 
या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी नवरदेवाचे वडील, सासरे, मंगल कार्यालयाचा मालक आणि इतर ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेनी किल्ल्याच्या पायथ्याशी बारव भागात झालेला हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत होता. दोन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय मंडळी, आजी-माजी आमदार हजर होते. महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे (रा. माणकेश्वर) व चैतन्य उल्हास मिंडे( रा.तांबे ता. जुन्नर जि.पुणे व सुधीर नामदेव घिगे (रा. दुधनोली ता.मुरबाड जि.ठाणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
 
२८ तारखेला जुन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी भेट दिली असता सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं त्यांना लक्षात आलं. तसेच सध्याच्या नियमांप्रमाणे लग्नसोहळ्यांना ठराविक माणसांना परवानगी असताना या लग्नसोहळ्यात २ हजारांच्या घरात माणसं जमली होती. त्यामुळे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी या लग्नसोहळ्याच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोविड संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावण्याची केंद्राची महाराष्ट्राला सूचना