Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना रूग्णाची कोविड रूग्णालयात आत्महत्या!

coronas patient
, शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (14:14 IST)
एका कोरोना रूग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय आणि कोविड रूग्णालय व्यवस्थापनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
पहुरजीरा येथील बद्रीनाथ वाघोडे(५०) या कोरोना संदिग्ध रूग्णाला खामगाव येथील कोविड रूग्णालयात १५ सप्टेंबर रोजी दुपारी भरती करण्यात आले. दरम्यान, या रूग्णाचा स्वॅब नमुना घेण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी संबंधित संदिग्ध रूग्णाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 
 
मात्र, तत्पूर्वीच कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बद्रीनाथ वाघोडे यांनी शौचालयात गळफास लावून आत्महत्या (suicide case)केली. ही घटना गुरूवारी रात्री उघडकीस आली. त्यामुळे उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस.बी.वानखडे यांनी दुजोरा दिला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fact Check: ‘दाऊद इब्राहिम’ सोबत हात मिळवणी करत अमिताभ बच्चन यांचा फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य