Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्वा रे विठ्ठल भक्ती, एक कोटी विठोबाच्या चरणी

व्वा रे विठ्ठल भक्ती, एक कोटी विठोबाच्या चरणी
, गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (15:01 IST)
पंढरीचा विठुराया याची ओळख म्हणजे गरीब कष्टकऱ्यांचा देव अशी आहे. आस घेऊन पायी वारत करत देव दर्शनाला येणार्‍या भक्तांच्या झोळीत तो काहीन काही टाकत असतो. आषाढात भक्तांमध्ये सावळ्या विठुरायाच्या चरणी लीन होण्याची आस असते. त्याला डोळे भरुन बघण्यासाठी किती तरी कष्ट घेतात भक्त. पण एखादा भक्त असा असेल ज्याला त्याच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी फक्त यासाठी नाही की त्यांची काळजी घेण्यासाठी विठुराया उभा आहे त्याला महान विठ्ठल भक्तच म्हणावं लागेल. 
 
विठुरायाच्या गरिब भक्तांमध्ये गरीब पण मनाने श्रीमंत आणि दानशूर भक्त भेटला आहे. अलीकडेच मंदिरातील दान पेटीत मुंबईतील या भाविकाने तब्बल एक कोटी रुपयांचे दान टाकले आहे आणि ते ही आपले नाव न सांगण्याच्या अटीवर. मंदिर समितीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका भाविकाने इतकी मोठी देणगी देण्याची घटना समोर आली आहे.
 
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व मंदिरे बंद होते. यामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर ही काही महिन्यांपासून दर्शनासाठी बंद असल्यामुळे समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये कमालीटी घट झाली आहे. कोरोनाकाळात मंदिर समितीचे सुमारे 45 कोटी रुपयांचे उत्पन्न घटले आहे. अशातच एका भाविकाने आपल्या लाडक्‍या विठुरायाच्या चरणी तब्बल एक कोटीचे दान अर्पण केले आहे. 
 
आश्चर्याची बाब म्हणजे ज्या भाविकाने मंदिराला गुप्त दान केले तो आता या जगात नाही. मुंबईतील एका विठ्ठल भक्ताचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. भक्ताने जाण्यापूर्वी आपल्या पत्नी आणि आईकडे अंतिम इच्छा बोलून दाखवली होती. ती म्हणजे की इन्शुरन्स कंपनीकडून मिळालेले विठुराच्या चरणी द्यावे. एवढी रक्कम मिळाल्यानंतर सहज कुटुंबाचं भविष्य सुरक्षित झालं असतं पण भक्तीची कमाल आणि पतीची अंतिम इच्छा म्हणून पत्नीने इतकी मोठी रक्कम देवूनही आपले नाव मात्र गुप्त ठेवण्याची विनंती मंदिर समिती केली आहे. यातूनच या भक्ताची विठ्ठलावर असलेली श्रद्धा अधोरेखित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्लिपकार्टला 10,000 कोटींचा दंड ?